जिल्ह्यातील ‘हे’ शहर सात दिवसांसाठी लॉकडाऊन

राहाता शहर ३० मार्चपासून सात दिवस लॉकडाऊन राहाता : शहर व परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख वाढता आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिक काटेकोरपणे करीत नाहीत. यामुळे राहाता शहर ३० मार्चपासून सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय राहाता नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राहता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये दवाखाने, मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता इतर व्यवसायीकांना आपले व्यवसाय सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहेत. नागरिकांनी गर्दी करु नये. मास्क वापरावा. घराच्या बाहेर पडू नये. आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे व नगरपरिषदेतर्फे केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post