काही लोकांकडून राजकीय स्वार्थापोटी गैरसमज पसरवण्याचे काम : आ.संग्राम जगताप


काही लोकांकडून राजकीय स्वार्थापोटी गैरसमज पसरवण्याचे काम : आ.संग्राम जगताप

तीन वर्षानंतर खुले झाले बाजार समितीचे गेट

नगर : स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजविण्यासाठी गैरसमज पसरविण्याचं काम काही लोकांनी केलं असलं तरी याकडे आपण मुळीच लक्ष देत नसून यापुढील काळात बाजार समितीच्या संदर्भात कोणताही प्रश्न असेल तर तो सोडवण्याची आमची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. तीन वर्षांपासून बंद असलेले नगर बाजार समितीचे गेट आ. जगताप यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी उघडण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

आ. जगताप म्हणाले, रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने एकेरी ट्राफिक करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर तसा अध्यादेशही मार्केट कमिटीला पाठवण्यात आला. या अध्यादेशामुळे हे गेट कायम स्वरूपी बंद करण्यात आले. एकच गेट चालू राहिल्यामुळे सगळ्यांना अडचनींना सामोरे जावे लागत होते. गेट बंद करण्या विषयी कोणाचीही मागणी नव्हती. परंतु यासंदर्भात काही लोकांनी स्टंटबाजी केली

 गेट बंद करण्याचा निर्णय हा मार्केट कमिटीचा असल्याचे काही लोकांनी भासवले. वास्तविक मार्केट कमेटीने स्वतःहून गेट बंद केले नव्हते. याउलट गेट उघडण्यासाठी मार्केट कमेटीची मागणी होती. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी खा. लोखंडे साहेबांशी एकदा नव्हे तर अनेकदा पत्रव्यवहार केला होता. यासंदर्भात खा. लोखंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला होता.परंतु त्यावेळेस आचार संहिता होती. यानंतर जिल्हाधिकारी यांनी निवडणूका संपल्यावर कार्यवाही करण्याचे सांगितले होते. काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यास वेळ लागला असल्याचेही आ. जगताप यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी सभापती अभिलाष धिगे, उपसभापती संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, हरीभाऊ कर्डोले, बहिरू कोतकर , राजेंद्र बोथरा, उद्धव कांबळे, अविनाश घुले सचिव अभय भिसे, संजय काळे यासह व्यापारी उपस्थित होते.

तीन वर्षापासून मार्केटचे  मुख्य गेट एकतर्फे बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती . व्यापारी वर्गाची अडचण झाली होती. हे गेट उघडण्यसाठी मा. आ. शिवाजी कर्डीले, बाजार समिती प्रयत्न चालू करीत होती .कोरोना , ग्रामपंचायत निवडणुका यामुळे वेळ लागला. चार दिवसापुर्वी गेट उघडे करण्याचा निर्णय झाला होता मात्र लेखी आदेश बाजार समितील मिळाला नाही . काल उशीरा हा आदेश मिळाला आज सकाळी हे प्रवेशद्वार उघडे करण्यात आले .

-अभिलाष घिगे, सभापती -बाजार समिती

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post