खा.डॉ.सुजय विखेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट, भूमीपूजनासाठी निमंत्रण

  


खा.डॉ.सुजय विखेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट, भूमीपूजनासाठी निमंत्रणनगर : खा.डॉ.सुजय विखे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासंदर्भात चर्चा केली.  यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते प्रकल्प व विविध विकासकामांसंदर्भात चर्चा झाली. सदर भेटीदरम्यान त्यांच्या माध्यमातून मान्यता मिळालेल्या विविध रस्ते प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. या रस्त्यांचे काम लवकरच सुरु होणार असून अहमदनगर-शिर्डी रस्ता, अहमदनगर शहर बायपास, अहमदनगर-करमाळा महामार्ग अशा अनेक रस्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी त्यांनी लवकरात लवकर वेळ द्यावा व ही विकासकामे मार्गी लावावीत अशी विनंती त्यांना केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post