सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षापद्धत आणि अभ्यास बदलणार

सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षापद्धत आणि अभ्यास बदलणार

 


नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE बोर्डाने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पद्धत आणि अभ्यास आमूलाग्र बदलण्यात येणार आहे. यापुढे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तयार करण्यासाठी ज्ञानाधारित शिक्षणाच्या तत्त्वावर आधारित त्यांचं मूल्यमापन  केलं जाईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार बदल करण्यात येणार आहेत.

CBSE ने मुख्यतः तीन विषयांसाठी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात बदल करायचं ठरवलं आहे. यामध्ये इंग्लिश (वाचन), विज्ञान आणि गणित या तीन विषयांचा समावेश आहे, अशी बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post