दूध का दूध, पानी का पानी" करावे - गृहमंत्री अनिल देशमुख

दूध का दूध, पानी का पानी" करावे - गृहमंत्री अनिल देशमुखमुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली. यानंतर आता महाविकासआघाडी सरकारने या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्त न्यायमूर्तींच्यामार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठीच्या चौकशी आयोगाची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी दूध का दूध, पानी का पानी करावे, असं म्हटलं आहे. 

मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते..., असं अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post