राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची कार्यकारिणी जाहीर

 केडगाव येथील राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची कार्यकारिणी जाहीर

विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबद्ध : आ. संग्राम जगताप



नगर : विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाबरोबरच शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करावी. मिळालेल्या पदाचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी करावा. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्‍न प्रलंबित असून ते सरकारच्या माध्यमातून सोडवू. विद्यार्थ्यांनी संघटित होऊन सामाजिक कार्य करण्याकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

केडगाव येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करुन पत्राचे वाटप करताना आ. संग्राम जगताप, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक संजय चोपडा, संभाजी पवार, साहेबान जहागीरदार, अमित खामकर, राजेश भालेराव, लंकेश चितळकर, शुभम बंब, राहुल नेटके संजय तवले, क्रषिकेश बागल सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 केडगाव विभाग प्रमुखपदी तुका कोतकर तसेच प्रभाग क्रमांक १६ च्या प्रमुखपदी अतुल लवांडे, प्रभाग १७ च्या प्रमुखपदी क्रषिकेश गवळी व न्यू आर्ट्स कॉलेज विद्यार्थी प्रतिनिधी विशाल सकट यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक संजय चोपडा, संभाजी पवार, साहेबान जहागीरदार, अमित खामकर, राजेश भालेराव, लंकेश चितळकर, शुभम बंब, राहुल नेटके संजय तवले, क्रषिकेश बागल सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post