आम आदमी पार्टीच्या आमदाराला २ वर्षांची शिक्षा

 


'आप'चे आमदार सोमनाथ भारती यांना दोन वर्षांची शिक्षानवी दिल्ली : माजी कायदा मंत्री आणि आपचे आमदार सोमनाथ भारती यांच्या अडचणीत वाढ झालीय. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने त्यांची 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवलीय. दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसानीसह त्यांच्यावर गंभीर आरोप होते. या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलंय 

सोमनाथ भारती यांनी 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आपल्याला खोट्या प्रकरणात फसवल्याचा दावा करत ही शिक्षा रद्द करण्याची मागणी केलीय. याआधी त्यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला एव्हेन्यू कोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, या प्रकरणी न्यायालयाने निकाल सुनावत 23 मार्च रोजी शिक्षा कायम ठेवली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post