हॉस्पिटलमध्ये शरद पवार करतायत आवडीचे काम...
मुंबई – पोटदुखीच्या त्रासामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून ते त्यांचं रोजचं आवडतं काम करत असल्याची माहिती त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून म्हटलंय की, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत असं सांगत त्यांनी शरद पवारांचा रुग्णालयात पेपर वाचत असतानाचा फोटो अपलोड केला आहे.
Post a Comment