दुकानदाराची भन्नाट आयडिया...एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री

एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री उल्हासनगर : वाढती महागाई आणि त्यात पेट्रोलच्या दरांनी गाठलेली शंभरी यामुळे सध्या सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. याच परिस्थितीचा फायदा घेत उल्हासनगरच्या एका व्यापाऱ्यांनं भन्नाट शक्कल लढवलीये. एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री देण्याची घोषणा या व्यापाऱ्यानं केलीये. त्याच्या या ऑफरला ग्राहकही चांगला प्रतिसाद देतायत.

उल्हासनगरच्या शिरु चौकात असलेल्या शीतल हँडलूम या दुकानाच्या मालकानं ही नवी ऑफर मार्केटमध्ये आणलीये. या दुकानात चादरी आणि पडदे विकले जातात. सध्याच्या परिस्थितीत बाजार थंड असल्यानं या दुकानाचे मालक ललित शिवकानी यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही आगळीवेगळी ऑफर आणलीये. यासाठी 17 सेक्शनच्या एचपी पेट्रोलपंपासोबत दुकानमालकाने टायअप केलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post