शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर, 'यांना' मिळाली जबाबदारी

 मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या सूचनेने नवी यादी जाहीर झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत  यांच्यासह खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या खासदार सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी पदोन्नती झाली आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यासारख्या नव्या नेत्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचं चित्र आहे. याशिवाय अ‍ॅड. अनिल परब, सुनील प्रभू, किशोरी पेडणेकर यासारख्या प्रवक्त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आले आहे. तर नाराज नेते भास्कर जाधव यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुका लक्षात घेत विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनाही प्रवक्तेपदाची धुरा मिळाली आहे.

हे आहेत प्रवक्ते....

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते
प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
सचिन अहिर – शिवसेना उपनेते
सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) 
अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) 
मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार 
किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) 
डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) 
किशोर कान्हेरे (नागपूर)
संजना घाडी 
आनंद दुबे (मुंबई)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post