१ टन भंगार साहित्यातून १३ फूट "मत्स्य'" शिल्प निर्मिती

 १ टन भंगार साहित्यातून १३ फूट उंचीचा महालक्ष्मी उद्यानात बोटीवरचा मत्स्य शिल्प निर्मिती

उद्याने ही शहराच्या विकासात व सौंदर्यात भर घालणारे : आ. संग्राम जगतापनगर : उद्याने ही शहराच्या विकासात व सौंदर्यात भर घालणारा विभाग आहे. या माध्यमातून जनतेच्या मनोरंजनाचे ठिकाण आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व परिवारातील इतर नागरिक विरंगुळ्यासाठी येत असतात. त्यांना महापालिकेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देणे आपले कर्तव्य आहे. यापुढील काळात नियोजन करुन चांगली उद्याने निर्माण करु. उद्यान विभागप्रमुख मेहेर लहारे यांनी चांगले काम करुन महालक्ष्मी उद्यानाचे रुपडे पालटण्याचे काम केले. याचबरोबर शहरातील आर्टिस्ट कलाकारांना  महालक्ष्मी उद्यानामध्ये जागा उपलब्ध करुन दिली व त्यांच्या कलांना वावा देण्यासाठी १ टन भंगार साहित्यातून १३ फूट उंचीचा बोटीवरचा मत्स्य शिल्प निर्मिती केल्याने मुलांच्या आकर्षणास नक्कीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

महालक्ष्मी उद्यान येथे नगर शहरातील कलाकारांनी १ टन भंगार साहित्यातून १३ फूट उंचीचा बोटीवरचा माशाचे शिल्पाचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक रवींद्र तात्या बारस्कर, ज्येष्ठ नागरिक विलास ताठे, उद्यान विभागप्रमुख मेहेर लहारे, सामाजिक कार्यकर्ते संजय ढोणे, सचिन जाधव, बाबासाहेब गिरवले, निखिल वारे, सुमित कुलकर्णी, दीपक खेडकर, क्रषिकेश चांदगुडे, राहूल कांबळे, अतुल आळकुटे आदी उपस्थित होते. 

या शिल्पाची निर्मिती क्रषिकेश संजय चांदगुडे यांनी केली असून ते सध्या सर ज. जी. कलामहाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या १०३ व्या आर्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीसाठी त्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. हे शिल्प साकारण्यात त्यांचे सहकारी राहूल कांबळे, अतुल आळकुटे, युसुफ यांनी मदत केली. या शिल्पातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यात पूर्णपणे उद्यानातील जुने पडून असलेले स्क्रॅप, जुन्या खेळण्या यात घसरगुंड्या, सी-सॉ, जुने लाईट्सचे पोल तसेच इतर खराब व गंजलेल्या काही खेळण्यांचा वापर वापर करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post