ना.थोरात हे चुकीच्या सल्लागारांमुळे काँग्रेस संघटनेचे प्रचंड नुकसान करीत आहेत

 निष्ठावंत कार्यकर्त्याला मान-सन्मान देणे हि पक्षाची जबाबदारी : विनायकराव देशमुख .


भिंगार काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष स्व. अँड.आर.आर.पिल्ले यांना प्रदेश काँन्ग्रेसची श्रध्दांजलीनगर : " काँन्ग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते गावोगावी अत्यंत निष्ठेने काम करीत आहेत. कोणत्याही पदाची अपेक्षा न धरता काम करणारे हे कार्यकर्ते म्हणजे पक्षाची संपत्ती आहे. अशा कार्यकर्त्यांना किमान मान-सन्मान मिळवून देणे , ही पक्षाची  जबाबदारी आहे. भिंगार ब्लॉक काँन्ग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष अँड.आर.आर.पिल्ले यांच्या अनपेक्षित निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे, " अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व अ.भा.काँग्रेस कमिटीचे सदस्य श्री. विनायकराव देशमुख यांनी स्व. अँड. आर.आर.पिल्ले यांना श्रध्दांजली अर्पण केली.

श्री.देशमुख यांनी आज सकाळी स्व.आर.आर.पिल्ले यांच्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी श्री. एच . के. पाटील, अ. भा.काँग्रेसचे सचिव श्री.वामसी रेड्डी यांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी श्री. देशमुख यांच्या समवेत प्रदेश सदस्य शाम वागस्कर, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, मा.शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, माजी नगरसेवक रुपसिंग दादा कदम, स्व.पिल्ले यांचे बंधू गोपाल पिल्ले, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, माध्यम प्रमुख राजेश सटाणकर, भिंगार महिला काँग्रेस अध्यक्षा मार्गारेट जाधव, भिंगार सरचिटणीस अनिल परदेशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यावेळी म्हणाले ,"स्व.पिल्ले यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले. मात्र जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी व शहर जिल्हा काँग्रेसने त्यांच्या निधनानंतर दाखविलेली संवेदनहीनता अत्यंत दु:खदायक व दुर्दैवी आहे. राज्याचे महसुलमंत्री व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात हे काल नगर शहराच्या दौरयावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत शहर जिल्हा काँन्ग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. आपल्याच एका सहकारयाचे ,भिंगार ब्लाँक काँग्रेस कमिटी अध्यक्ष अँड.आर.आर.पिल्ले यांचे नुकतेच निधन झालेले असताना त्यांना बैठकीत किमान श्रध्दांजली देखील अर्पण करण्यात आली नाही. याउलट भाजपच्या माजी खासदाराच्या घरी जाऊन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात व शहरातील काँग्रेस पदाधिकारयांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच त्यांनी स्व.पिल्ले यांच्या घरी जाणे गरजेचे होते. ना.थोरात हे चुकीच्या सल्लागारांमुळे नगर शहरातील काँग्रेस संघटनेचे प्रचंड नुकसान करीत आहेत. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. "

यावेळी बोलताना जिल्हा सरचिटणीस उबेद शेख म्हणाले, " माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या ना. बाळासाहेब थोरात यांनी काल नगर शहरात असताना स्व.पिल्ले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परीवाराचे सांत्वन करणे ही त्यांची जबाबदारी होती. स्व.पिल्ले हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तर होतेच  पण त्यांचे वडील क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक होते. ना.थोरात यांच्या या गटबाजीने प्रेरीत वागणुकीचे  काँग्रेस पक्षात जिल्हाभर  तीव्र पडसाद उमटत असुन  कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. "

"स्व.इंदिरा गांधी यांच्या काळात सामान्य कार्यकर्त्याला शक्ती व सन्मान देण्याचे काम केले जात असे. त्यामुळे काँग्रेस तळागाळापर्यंत भक्कम होती. आता मात्र  मी, माझे नातेवाईक, माझा गट या विचारामुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे. " अशी भावना श्री. राजेश सटाणकर यांनी व्यक्त केल्या. शेवटी प्रदेश सदस्य शाम वागस्कर यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post