शुभमंगल ‘सावधान’...बोगस लग्न लावून लाखो रुपये उकळणारी टोळी जेरबंद
कर्जत : बनावट लग्न लावून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा म्होरक्या, बनावट नवरी यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन आरोपी फरार आहेत.
याप्रकरणी कर्जत पोलिसांत राजू वैजनाथ हिवाळे (रा. सिंहरोड, पुणे), विलास जोजरे (रा. हिंगोली), मंगलबाई दत्तात्रय वाघ (रा. पोखर्णे, सोनपेठ, परभणी), पल्लवी गोमाजी सगट (रा. मोहाला, सोनपेठ, परभणी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
कर्जत तालुक्यातील एका गावातील मुलाचे लग्न जमविण्यासाठी मुलाच्या वडिलांनी स्थळांबद्दल चौकशी केली होती. त्यानुसार राजू वैजनाथ हिवाळे, विलास जोजरे, मंगलबाई दत्तात्रय वाघ, पल्लवी गोमाजी सगट यांनी लग्न जुळविले होते. त्यासाठी त्यांनी दोन लाख दहा हजारांची रक्कम मागविली होती. ती रक्कमही देण्यात आली. त्या महिलेचे अगोदरच तीन लग्न झाले होते. ही माहितीही लपवून ठेवण्यात आली होती. तसेच लग्नही कायदेशीर पद्धतीने न करता घाईघडबडीत उरकण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये फिर्यादीची दोन लाख दहा हजारांची फसवणूक झाली. यापैकी साठ हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मारुती काळे करत आहेत.
Post a Comment