नागपूरात लॉकडाऊन, राज्याबाबतही दोन दिवसांत निर्णय...मुख्यमंत्र्यांचे मोठ वक्तव्य

नागपूरात लॉकडाऊन, राज्याबाबतही दोन दिवसांत निर्णय...मुख्यमंत्र्यांचे मोठ वक्तव्य

 


मुंबई : नागपूर शहरात 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाची लस घेतली. लस घेतल्यानंतर बोलताना त्यांनी म्हटलं की, लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. मी स्वत: लस घेतली आहे आता जनतेनेही घ्यावी, असं मी सर्वांना आवाहन करतो. उद्धव ठाकरे यांनी भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस घेतली आहे.  


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post