सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी...थांबविलेला महागाई भत्ता तीन हप्त्यांत देण्याचा निर्णय

 थांबविलेला महागाई भत्ता तीन हप्त्यांत देण्याचा निर्णयनवी दिल्लीः केंद्र सरकारने कोरोना संकटातही सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा थांबविलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलत या तीन हप्त्यांत देण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे रोखलेले तीन हप्त्ये लवकरात लवकर देण्यात येणार असल्याचं आश्वासन वित्त मंत्रालयाने मंगळवारी दिले. तसेच त्यांना 1 जुलै 2021 पासून लागू असलेल्या प्रभावी दरावर हप्त्यांचा मोबदला दिला जाणार आहे.

राज्यसभेत लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, कोरोना संकटाच्या वेळी बंद झालेल्या महागाई भत्त्याच्या हप्त्यापासून केंद्र सरकारने 37,430.08 कोटी रुपये वाचविले, ज्याचा उपयोग साथीच्या रोगाशी सामना करण्यासाठी केला जात होता. ते म्हणाले की, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याचा हप्ता आणि निवृत्तीवेतनधारकांची महागाई सवलत 1 जानेवारी 2020, 1 जुलै, 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून थांबविण्यात आली होती. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 17 टक्के महागाई भत्ता देण्यात येत आहे. त्यात 4 टक्के वाढीस मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय. यामुळे महागाई भत्ता 21 टक्क्यांवर जाईल, जो 1 जुलै 2021 पासून लागू होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post