नगरमध्ये उघड्यावरच शिजवले जाते मांस, नगरसेवकाने केली कारवाईची मागणी

 पारिजात चौकातील उघड्यावर मांस शिजविणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करावी

महापालिका कायद्याची भीती उरली नाही : नगरसेवक रामदास आंधळे
नगर : महापालिका कायद्याची भीती नागरिकांमध्ये उरली नसल्यामुळे उघडपणे परवानगी
नसतानाही व्यवसाय सुरू आहेत. गुलमोहोर रोड, पारिजात चौक परिसर हा रेसीडेन्शिअल परिसर
आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे. तसेच पारिजात चौक परिसरामध्ये मोठी
धार्मिक स्थळे असून उदा. गणेश मंदिर, विठ्ठल मंदिर, गजानन महाराजांचे मंदीर, स्वामी समर्थ
हाराजांचे मंदीर आदींसह अनेक मंदिरे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पारिजात चौकात राजरोसपणे
कुणाचीही परवानगी न घेता उघड्यावरती मांस शिजविण्याचे काम सुरु असल्यामुळे या भागातील
नागरिकांना यामुळे होणाऱ्या वासाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या भावनाही
दुखावल्या जात आहेत. तसेच रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी होते. परिजात चौकात
हॉटेलांना कुठलीही परवानगी नसताना अनेक उद्योग या ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे.
एमएसर्ईबीने परवानगी नसणाऱ्या ठिकाणी लाईटचे कनेक्शन दिले. हे सगळे कोणत्या आधारावर
प्रशासनाने करुन देत आहे. या गोष्टीकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे. त्यामुळे
परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. उघड्यावर शिजविणाऱ्या मांसामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक या ठिकाणी व्यवसाय सुरू करीत आहे. त्यांची कुठलीही माहिती प्रशासनाकडे नाही. पत्र्याचे शेड उभारुन हॉटेल व व्यवसाय सुरु करण्यास महापालिकेने काय मुक परवानगी आहे काय? प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष देऊन तसेच नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक रामदास आंधळे यांनी केली.

1/Post a Comment/Comments

 1. Its propogenda subject.
  त्या नगरसेवकाला सध्या अचानक डोळे आले का ?

  त्याच रस्त्यावर अनेक चायनिज हाॅटेल आहेत. तेथे ही असेच तंदुर सेंटर आहे.

  याच हाॅटेल वर तोतया नगरसेवकाला वास का येतो ? हे पहावे लागेल.

  सदरहु हाॅटेलवर गर्दी असते याचा राग आहे की फुकट देत नाही याचा राग ...!!!
  अहमद नगर मधील सर्वत्र सुरु असलेल्या चायनिज स्ट्रीट फुड स्टाॅलचे चित्र टाका ....

  ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post