गुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे

 *गुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे*अहमदनगर प्रतिनिधी ) - जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील सत्ताधारी गुरुमाऊली शिक्षक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी शिक्षक संघाचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजकुमार उर्फ  राजू साळवे यांची काल सर्वानुमते बिनविरोध निवड  करण्यात आली .

गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्याकडे दोन पदे असल्याने एक पद सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शिक्षक संघ आणि गुरुमाऊली मंडळाचे त्रैवार्षिक अधिवेशन कोरोनामुळे लांबणीवर पडल्याने आणि शिक्षक संघाचे भव्य त्रैवार्षिक अधिवेशन घेऊनच लोकशाही पद्धतीने निवड करण्याचा आदेश राज्य संघाने दिल्याने जिल्हा गुरुमाउली मंडळाच्या निवडीसाठी काल जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली. तीन तास चाललेल्या या मॅरेथॉन मीटिंग मधील चर्चेनंतर राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांनी ही निवड जाहीर केली. राजू साळवे यांच्या निवडीने जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या एका चांगल्या कार्यकर्त्याला उच्च पदावर काम करण्याची संधी मिळाल्याने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.

तत्पूर्वी काल दुपारी चार वाजता ऑनलाइन मीटिंगमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी शिक्षक बँकेच्या सभासदाभिमुख  कारभाराबद्दल शिक्षक बँकेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचे हार्दिक अभिनंदन केले.पूर्ण पाच वर्षांमध्ये गुरुमाऊली मंडळाने बँकेमध्ये आदर्श कारभार करून सभासद हिताचे अनेक निर्णय घेतले.कर्जाचा व्याजदर कमी केला.कायम ठेवीवर सर्वाधिक व्याज दिला.याबद्दल सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यानंतर विद्यमान जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी दोन्हीही पदे सोडण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु राज्य संघाच्या आदेशानुसार संघाच्या पदांमध्ये फेरबदल करता येणार नाही असे ठरल्यामुळे एकच पद बदलण्याचा निर्णय घेण्यात आला तरीही जिल्ह्यातील बहुतांश कार्यकर्त्यांनी त्यांना पद न सोडण्याचा आग्रह केला. परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.ऑनलाईन मीटिंग चालू असताना राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट हे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी फोनवर चर्चा करुन त्यांची मते जाणून घेत होते. मिटींगच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी सर्व अहवाल बापूसाहेब तांबे यांना सादर केला व त्यांच्या सूचनेनुसार ही निवड जाहीर करण्यात आली.

 गुरुमाऊली महिला  आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई आढाव यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी  राजकुमार साळवे यांच्या नावाची सूचना मांडली.त्यास विद्यमान कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांनी ही निवड जाहीर केली.

राजू साळवे यांच्या निवडीने जिल्ह्यातील बहुजन समाजातील एका चांगल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असून बापूसाहेब तांबे यांनी जो विश्वास साळवे यांच्यावर दाखविला, तो ते निश्चित सार्थ ठरवतील अशा भावना जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. निवडीनंतर जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी राजू साळवे यांचे अभिनंदन केले. रात्रभर त्यांच्या अभिनंदनाच्या मेसेजचा वर्षाव सोशल मीडियावर सुरू होता. राजकुमार साळवे नोकरीच्या सुरुवातीपासूनच संघटनेमधील विविध पदावर काम करून जिल्हाभरातील शिक्षकांचा एक वेगळा संग्रह जमू नाहीत त्यांच्या विनोदी शैलीने ते सर्व सभागृहाची मने जिंकतात..

या ऑनलाइन मीटिंगमध्ये बाळासाहेब सरोदे, अण्णासाहेब आभाळे, कैलास सहाणे, बाळासाहेब तापकीर, शरद भाऊ सुद्रिक, संतोष दुसुंगे,साहेबराव अनाप, सलीमखान पठाण, बाबा खरात, सुयोग पवार, बँकेचे चेअरमन राजू राहणे, शिक्षक नेते आर टी साबळे, अंजली मुळे, यास्मिन शेख,मनिषा कोथिंबिरे,मिनाक्षी अवचरे,विठ्ठल काळे, पुंडलिक सोनवणे, अशोक गिरी, पी डी सोनवणे, आबासाहेब दळवी ,सोमनाथ गळंगे, सूर्यकांत काळे, बाबाजी डुकरे,नितीन पंडित ,सुरेश निवडूंगे, मंगेश खिलारी, रामेश्वर चोपडे, विजय ठाणगे,निवृत्ती गोरे,किशोर माकुडे, विलास गवळी , शशिकांत जेजुरकर,अमोल मांगुडे,सुनील गायकवाड ,संतोष वाघमोडे, शकील बागवान, नितिन कोळसे ,बेनहर वैरागर, सरदार पटेल, विठ्ठल काकडे, शिवाजी वाघ,गोरक्ष विटनोर, मच्छिंद्र लोखंडे, पुंजाहरी सुपेकर, वाघोजी पटारे,सुरेश शिरोळे,विजय नरवडे आदींसह जिल्हाभरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला . मिटींगचे आयोजन, संयोजन, नियंत्रण व आभार मनोजकुमार सोनवणे यांनी मानले.जिल्हा संघ व गुरुमाऊली मंडळाचे त्रैवार्षिक अधिवेशन घेऊन या निवडी सात मार्च रोजी जाहीर करण्याचे निश्चित झाले होते. मात्र कोरोनाचा वाढता कहर आणि राज्य संघाने त्रैवार्षिक अधिवेशन घेऊनच निवड करण्याचे सुचविल्याने जिल्हा संघाची निवड त्रैवार्षिक अधिवेशनात करण्यात येईल. माझ्याकडील एका पदाचा त्याग करीत ऑनलाइन पद्धतीने गुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणी त्रैवार्षिक अधिवेशनात जाहीर करण्यात येईल.

 *बापूसाहेब तांबे*

 *नेते, गुरुमाऊली मंडळ.*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post