दहा वर्षीय चिमुरडीवर पित्यानेच केला अत्याचार

दहा वर्षीय चिमुरडीवर पित्यानेच  केला अत्याचार नगर  श्रीरामपूर तालुक्‍यातील निमगावखैरी येथे दहा वर्षीय चिमुरडीवर पित्यानेच अत्याचार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. यासंदर्भात पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात पिडीतेच्या वडीलांविरुध्द गुन्हा दाखल झाला.

तालुक्‍यातील निमगावखैरी परिसरात एका पोल्ट्रीफार्मवर काम करीत असलेल्या परप्रांतीय कुटुंबात हा प्रकार झाला. शुक्रवारी (ता. 19) सायंकाळी सात वाजता पोल्ट्री फार्मसमोरील घरामध्ये 27 वर्षीय पित्याने स्वत:च्या दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पिडीतेच्या आईने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पिडीतेच्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन संशयीताला तातडीने अटक केली. 

पोलिसांनी येथील न्यायालयात संशयीत आरोपीला हजर केले. न्यायालयाने आरोपीला पुढील तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुल बोरसे करीत आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post