मंत्री आहेत की गणपती मंडळाचे अध्यक्ष? मनसेची वडेट्टीवारांवर बोचरी टिका

 मंत्री आहेत की गणपती मंडळाचे अध्यक्ष? मनसेची वडेट्टीवारांवर बोचरी टिकांनगर : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबतच्या निर्णयाची मला माहिती नव्हती असा धक्कादायक खुलासा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल केला. त्यावरुन वडेट्टीवार यांच्यावर राज्यभरातून टिका होत आहे. नगरमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनीही वडेट्टीवार यांच्या खुलाशावर व्टिटरवरुन बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार मंत्री आहेत की गणपती मंडळाचे अध्यक्ष? असा सवाल उपस्थित करीत वर्मा यांनी कॉप्या करून पास झालेल्यांचे असंच असतं, अशी तिरकस प्रतिक्रिया नोंदवली आहे.

वर्मा यांनी म्हटले आहे की, एमपीएससी परिक्षेबाबत मला न विचारता माझ्या विभागाने निर्णय घेतला म्हणताय विजय वडेट्टीवार, हे कॉप्या करून पास झालेल्यांचं असंच असतं , मंत्री आहेत की गणपती मंडळाचे अध्यक्ष ?..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post