टेम्पो बस स्थानकात घुसल्याने अपघात, एकाचा मृत्यू तर चौघे जखमी

 टेम्पो बस स्थानकात घुसल्याने अपघात, एकाचा मृत्यू तर चौघे जखमी नगर : द्राक्षांची वाहतूक करणारा टेम्पो बस स्थानकात घुसल्याने अहमदनगरमध्ये अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर चौघे जण जखमी झाले आहेत. अपघातात बस स्थानक आणि काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. श्रीगोंदा तालुक्यातून द्राक्षांच्या पेट्या घेऊन संबंधित टेम्पो नाशिकच्या दिशेने निघाला होता. पारनेर तालुक्यातून जाताना कान्हूरपठार गावात हा अपघात झाला. टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्थानकात शिरला. टेम्पोची धडक बसल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर चौघं जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post