कारखानदार, प्रस्थापितांना मी घाबरत नाही, सर्वांना पुरुन उरेल : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

 कारखानदार, प्रस्थापितांना मी घाबरत नाही, सर्वांना पुरुन उरेल : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेचे कर्ज मार्चअखेर भरण्याचे आवाहननगर : शेतकर्‍याला आर्थिक मदत व्हावी व शेतीव्यवसायासाठी लागणारी मदत म्हणून खेळते भांडवलाच्या रूपाने देण्याचे काम मागील जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतल्यामुळे सर्वात जास्त 129 कोटी रूपयाचा लाभ नगर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळाले. मार्चनंतर पशूपालन खेळते भाडवंल कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज देण्यासाठी प्रयत्न करणार. कर्ज वसूली होणे गरजेचे असून शेतकर्‍यांनी खरीप व रब्बी पिकासाठी शुन्य टक्के व पशुपालन खेळते भाडवंलाचे कर्ज भरून केंद्र सरकारचे 3 टक्के अनुदान मिळवावे. नगर तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांनी घेतलेले कर्ज मार्च अखेर भरून कारखानदारांना दाखवून द्या की आम्ही प्रामाणिक आहोत. कारखानदार शेतकर्‍यांची वसूली करण्यासाठी नियम लावतात. तेच नियम कारखानदारांना यापुढे लावले जातील. जिल्ह्यातील कारखानदार व प्रस्थापित पुढार्‍यांनी मला राजकारणातून संपवण्यासाठी खुप प्रयत्न केले. या सर्वांच्या नाड्या माझ्याजवळ आहे. यांना राजकारणात पुरून उरेल एवढी क्षमता माझ्यात आहे. मी कधीही बेकायदेशीर काम करत नाही. जे काही काम करतो ते नियमात करतो. त्यामुळे मला यांना घाबरण्याची गरज नाही. बॅकेत बेकायदेशीर वाटलेले कर्ज यांच्या कारखान्याकडे आहे. बॅकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांनाच लाभ होईल यासाठी संघर्ष करीत राहिल असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

नगर तालुक्यातील शेतकर्‍यांनी घेतलेल्या रब्बी, गरीब व पशुपालन खेळते भाडवंल कर्ज वसूली संदर्भातील सचिव व शाखाधिकाराच्या बैठकीत बोलताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले. समवेत बॅकेचे कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, सुधाकर वर्पे आनंदराव शेळके, रामदास सोनवणे, इस्माईल शेख, महादेव कराळे, शैलेश बोधले आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post