संपत्तीचा वाद, काकाने पुतण्याची जिनिंग मिलच जाळली

संपत्तीचा वाद, काकाने पुतण्याची जिनिंग मिलच जाळली वर्धा :वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे संपत्तीच्या वादातून काकानेच पुतण्याची जिनिंग फॅक्टरी जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोबतच पुतण्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न काकाने केला आहे.  या प्रकरणी आर्वी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी काका दीपक देशमुख याला पोलिसांनी अटक केली.या घटनेत जिनिंगमधील 45 ते 50 लाखांचा कापूस जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर आर्वी नगर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठत आग विझवली. दाखल केलेल्या तक्रारीनुसार आर्वी येथील कौस्तुभ देशमुख यांच्या मालकीची एक जिनिंग आहे. ते त्यांच्या जिनिंमध्ये काम करत होते. यावेळी आरोपी दीपक देशमुख म्हणजेच कौस्तुभ देशमुख यांचे काका तलवार घेऊन आले. यावेळी त्यांनी कौस्तुभला धमकावलं. तसेच, त्यांनी पेट्रोल टाकून जिनिंगमध्ये आग लावली.  आग वाढल्यामुळे कोस्तुभ आपला जीव वाचवत पोलीस ठाण्यात गेले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post