राज्यपाल महोदय, राज्य वाचवा...भाजपच्या शिष्टमंडळाचे निवेदन

राज्यपाल महोदय, राज्य वाचवा...भाजपच्या शिष्टमंडळाचे निवेदन
 पोलिसांना कायदा सुव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी वापरण्याऐवजी पक्षाच्या वसुलीसाठी वापरले जात आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. अधिकाऱ्यांमध्ये आतंक आहे. त्यांना बदलीची आणि कारवाईची भीती दाखविली जात आहे. राज्यामध्ये भ्रष्टाचार, बदल्यांचे रॅकेट आहे अशी या ठाकरे सरकारची 100 प्रकरणे राज्यापालांना दिल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  जे गोपनिय अहवाल सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यपालांना भेटून आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.  गृहमंत्री अनिल देशमुखांना एक क्षणही पदावर राहण्याचा हक्क नाही. शरद पवारांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या. राज्यात घडत असलेल्या मोठ्या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत का नाही. राज्यपालांनी त्यांना बोलते करायला हवे. वसुली, बदल्यांचे रॅकेट या घटना धक्कादायक आहेत. मुख्यमंत्री यावर काहीच बोलत का नाहीत, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पवारांनी त्यांच्या मंत्र्याला वाचविण्याचाच प्रयत्न केला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post