नगर तालुक्यात राष्ट्रवादी जोमात...रमेश भांबरेंसह कार्यकर्त्यांनी बांधले ‘घड्याळ’

 रुईछत्तीसीचे मा. सरपंच रमेश भांबरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध : पालकमंत्री हसन मुश्रीफनगर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहिला आहे. शासनाच्या माध्यमातून विविध योजना गावतापळीपर्यंत पोहचवून यशस्वीपणे राबवित असल्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळाली आहे. ग्रामीण भागातील जनता नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर व शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराबरोबर राहिले आहे. रुईछत्तीसी गावचे माजी सरपंच रमेश भांबरे हे तळागाळातील कार्यकर्ता आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यामुळे गावच्या विकासात भर पडत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य गावकऱ्यांनी राष्टवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देतो व पुढील काळात एकनिष्ठाने पक्षाचे विकासाचे ध्येय धोरण पोहचविण्याचे काम कराल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

नगर तालुक्‍यातील रुईछत्तीसी गावचे माजी सरपंच रमेश भांबरे, सरपंच विलास लोखंडे, उपसरपंच विशाल भांबरे, मच्छिंद्र भांबरे, अशोक भुजबळ, भैय्या गोरे, सागर गोरे, नानासाहेब खकाळ, संजय खकाळ, बाबासाहेब पवार, प्रशांत वाळके, निलेश गोरे, शरद गोरे, दत्तात्रय पवार, शरद पवार, धनंजय खकाळ, भरत भुजबळ, बबन गोरे, रियाज शेख, जावेद शेख आदींनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आ. अरुणकाका जगताप, आ. नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नेते घनशाम अण्णा शेलार, अंबादास गारुडकर, अभिजित खोसे सीताराम काकडे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post