नगर शेजारील ‘या’ जिल्ह्यात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन

 बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊनबीड : बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 26 मार्चला रात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत बीडमध्ये लॉकडाऊन असेल. कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोव्हिडचा समूह संसर्ग टाळण्यासाठी बीड जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लॉकडाऊनसंबंधी आदेश काढले आहेत. 26 मार्चला रात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत दहा दिवस लॉकडाऊन लागू करण्यात येईल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post