प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीने संपन्न

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीने संपन्न



अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली सभा दुपारी तीन वाजता संपली. सभेमध्ये एक-दोन अपवाद वगळता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सखोल चर्चा होऊन सभा पार पडली.अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन राजू राहाणे होते. यावेळी व्हाईस चेअरमन श्रीमती उषाताई बनकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. सभेमध्ये सरस्वती पूजनानंतर अहवाल सालामध्ये दिवंगत झालेल्या सभासदांना व देशभरातील नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर चेअरमन राजू राहाणे यांनी आपल्या दीड तासाच्या प्रदीर्घ प्रास्ताविक भाषणामध्ये अहवालाचा आढावा घेतला. त्यानंतर पहिला विषय मागील प्रोसिडिंग कायम करणे हा सर्वानुमते कायम करण्यात आला. दुसरा विषय अहवाल आणि ताळेबंद मंजुरीचा मंजुरीला टाकल्यानंतर त्यावर चर्चा घेण्यात आली. या चर्चेमध्ये विविध संघटनांचे प्रतिनिधी सर्व श्री. संजय कळमकर, राजेंद्र शिंदे, राजू साळवे, राजेंद्र निमसे, एलपी नरसाळे, मीनल शेळके, विकास डावखरे, एकनाथ व्यवहारे, बाळासाहेब सरोदे, राजेंद्र ठोकळ, संतोष वाघमोडे, विठ्ठल काळे यांचे सह अनेक सभासदांनी आपल्या भावना आणि अहवालावर मते व्यक्त केली.विकास डावखरे यांनी सभेच्या शिरस्त्यानुसार परवानगी न घेता भाषण केले. 45 मिनिटांच्या भाषणात त्यांनी संचालक मंडळावर अनेक आरोप केले. त्याला उत्तर देताना गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी चांगली चिरफाड केली. घड्याळ खरेदी माजी चेअरमनच्या निर्णयानुसार झालेली आहे. जे लोक परवानगी न घेता सभेत शिरकाव करतात हे नेता तसा कार्यकर्ता या वृती प्रमाणे वागतात. त्यांनी 45 मिनिटे वेळ घेऊन सभेला गालबोट लावले असे तांबे यांनी सांगितले.

 परिषदेचे प्रवीण ठुबे यांनी सुद्धा संचालकांवर आरोप केले. रात्रीतून अहवाल बदलल्याची  टीका केली . त्यावर देखील चेअरमन राजू राहाणे यांनी खुलासा केला कि अहवालामध्ये प्रिंट मिस्टेक आहे. ही मानवी चूक असून यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. शिवाय ते आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकाचे आकडे आहेत. परंतु केवळ लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी विरोधकांनी अशा पद्धतीचे आरोप केले. मात्र सभासदांना सर्व काही ज्ञात असल्याने या सर्व बाबी त्यांच्या वेळीच लक्षात आलेल्या आहेत .

गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे यांनी देखील विरोधकांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी विरोधकांच्या नेत्याची आणि स्वतःची नार्को टेस्ट करण्याची तयारी दाखवली.

डावखरे आणि ठुबे यांनी घातलेल्या गोंधळाने सभेला काहीवेळ गालबोट लागले. मात्र नंतर सभा सुरळीत सुरू झाली. संचालक मंडळाच्या वतीने चेअरमन राजू राहाणे तसेच बँक शताब्दी समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण, माजी व्हाईस चेअरमन विद्युल्लता आढाव, माजी चेअरमन शरद सुद्रिक, माजी व्हा .चेअरमन अर्जुन शिरसाठ, संचालक सुयोग पवार आदींनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. या ऑनलाइन सभेला झूम ॲप व यू ट्यूबच्या माध्यमातून 3800 सभासदांनी हजेरी लावली. शेवटी माजी चेअरमन साहेबराव आनाप यांनी आभार मानले.

सभेला चेअरमन राजू राहणे, व्हाईस चेअरमन उषाताई बनकर, संचालक शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाट, संतोष दुसुंगे, नानासाहेब बडाख, बाळासाहेब मुखेकर, सीमा क्षीरसागर, विद्युल्लता आढाव, दिलीप औताडे, किसन खेमनर, राजू मुंगसे, बाबासाहेब खरात, अविनाश निंबोरे, संतोष आकोलकर, अनिल भवार, सलीमखान पठाण, गंगाराम गोडे, मंजुषा नरवडे, सुयोग पवार ,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, ठोंबळ, चौधरी, मस्के, पाटील आदी उपस्थित होते .


विकास डावखरे व प्रवीण ठुबे यांनी आजच्या सभेत घातलेला गोंधळ हा अशोभनीय असून ऑनलाइन सभा असल्याने गोंधळ होणार नाही अशी अपेक्षा होती मात्र या लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सभेला गालबोट लागले गेली पंधरा वर्षे बँकेच्या सभेत कोणते लोक गोंधळ घालतात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले .

राजकुमार साळवे जिल्हाध्यक्ष

 गुरुमाऊली मंडळ


राज्य कार्यक्षेत्र विषय तहकूब

बहुसंख्येने जिल्ह्यातील बहुसंख्य सभासदांच्या भावना लक्षात घेऊन बँकेचे कार्यक्षेत्र राज्य करण्याचा विषय पुढील सभेत पर्यंत स्थगित करण्यात आला आहे .

राजू राहाणे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post