निवडणुका बिनविरोध झाल्या तर गावातील वादविवाद मिटतील - मा. आ. शिवाजीराव कर्डीले
नगर : शेतकऱ्याची कामधेनु असणारी विविध कार्यकारी मेवा सहकारी सोसायटी निवडणुक बिनविरोध करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न केले . प्रत्येक गावात अश्याच पध्दतीने निवडणुका बिनविरोध झाल्या तर गावातील वादविवाद मिटतील गावचा विकास होईल असे प्रतिपादन मा. आ. शिवाजीराव कर्डीले यांनी केले.
बाबुर्डी बेंद ( ता. नगर ) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा मा. आ. शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते . यावेळी बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, हरीभाऊ कर्डीले ,बन्सी कराळे , बाबासाहेब खर्से, उपास्थित होते बिनविरोध निवडूण आलेले उमेदवार रेवणनाथ रावसाहेब चोभे, रेश्मा रेवणनाथ चोभे,दत्तात्रय मारुती खेंगट,बिभीषन गिरीधर खेंगट, तुकाराम ज्ञानदेव चोभे, पोपट किसन चोभे, सतिष रामदास चोभे, उध्दव सुरेश चोभे , महेश मच्छिंद्र चोभे, वेनुबाई आप्पासाहेब खेंगट, राजाराम विठठल चोभे,शंकर बबन पडोळकर, लक्षमीबाई दादाबा साळे यावेळी उपसरपंच आण्णा चोभे, काशिनाथ चोभे, दादा चोभे, सुनिल चोभे, मनराज चोभे उपास्थित होते .
Post a Comment