माजी आमदार बाबूजी आव्हाड यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी

  माजी आमदार बाबूजी आव्हाड यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी - खासदार डॉ.सुजय विखे पाटील नगर, (दि.31) स्वर्गीय स्वातंत्र्यसेनानी व माजी आमदार बाबूजी आव्हाड यांचे जीवन चरित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. बाबूजींनी तालुक्याच्या विकासासाठी बहुमोल योगदान दिले आहे ते कधीही विसरणार नाही.  पाथर्डी तालुक्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मार्फत योजना कार्यान्वित करण्याचा आपला मानस असून योजनांच्या पूर्ततेसाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

पाथर्डी येथे थोर स्वतंत्र सेनानी व माजी आ स्व.बाबूजी आव्हाड यांच्या १००व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन सोहळ्या प्रसंगी डॉ.सुजय विखे पाटील बोलत होते यावेळी जेष्ठ नागरिकांचा सत्कार व गरजू नागरिकांना छत्री,  गरजू विद्यार्थीनीनां मोफत सायकल चे वाटप खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ मृत्यूजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, अभय काका आव्हाड,कॉब्रेड कावा शिरसाठ,ऍड विश्वासराव आठरे, गजानन कोष्टी, ऍड सुरेश आव्हाड, अजय रक्ताटे, नगरसेवक प्रसाद आव्हाड ,बंडू शेट बोरूडे व ग्रामस्थ उपस्थित होते

खासदार डॉ. विखे पाटील यांनी तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीत  बोलताना खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की,  नुकत्याच झालेल्या गारपिटीने 27 गावांमधील चार हजार हेक्टर क्षेत्र  बाधित झाले आहे बाधित क्षेत्राची प्राथमिक नुकसान भरपाई चा अंदाज प्रशासने घेवून त्यादृष्टीने प्रशासनाने तातडीने पंचनामे करून याचा विस्तृत अहवाल राज्य शासनाकडे पाठवावा व ही नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यानंतर खासदार डॉ. विखे पाटील यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली कोरोना लसीकरणा बाबत आढावा घेण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील कोरोना सेंटर तसेच लसीकरण याच्या बाबतीत या वेळेस चर्चा करण्यात आली व ज्यांना पहिला डोस दिला गेलेला आहे अशा नागरिकांशी संपर्क साधून ठरलेल्या वेळेनुसार दुसरा डोस देण्यात यावा असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

 खासदार विखे पाटील म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग क्र.222 चे दुर्देवाने या महामार्गाच्या अपेक्षित गतीने पूर्ण झालेले नाहीत यापूर्वीच्या ठेकेदारांनी कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही व त्याचा मनस्ताप नागरिकांना होत आहे संबंधित  ठेकेदाराला याबाबत सूचना दिलेले असून काम लवकरात लवकर मार्ग लागेल अशी अपेक्षा खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post