कोरोनाचा विस्फोट, नगर तालुक्यातील ‘हे’ गाव प्रशासनाकडून ८ दिवस गाव बंद

 अरणगाव मध्ये कोरोनाचा विस्फोट, प्रशासनाकडून ८ दिवस गाव बंद
नगर : नगर तालुक्यातील अरणगाव येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोनशेच्या वर गेल्याने तालुका प्रशासनाने गावात ८ दिवस कॅन्टोन्टमेंट झोन जाहिर केला आहे . 

नगर तालुका शहराजवळ असल्याने शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे . तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील कोव्हीड सेंटर तीन महिन्यापुर्वीच बंद झाल्याने तालुक्यातील शेकडो रुग्ण सध्या शहरातील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत . तालुक्यात १ मार्च ते २५ मार्च पर्यत ५००पेक्षा रूग्ण आढळुन आले आहेत .एकटया अरणगाव मध्ये दि .२६ मार्च नंतर दोनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळुन आल्याची माहिती सुत्रांनी दिली . मात्र आरोग्यविभागाच्या लेखी अरणगावमध्ये फक्त २६ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची अनधिकृत माहिती आहे .

दरम्यान अरणगाव मध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने तहसिलदार उमेश पाटील यांनी शनिवारी आदेश काढुन गावातील बहुतांशी भाग दि . ८ एप्रिल पर्यत कॉन्टेटंमेंट म्हणुन जाहिर केला असुन आज गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गाव बंद करण्यात आले आहे . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा समितीने गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार गावठाण ,मारुती नगर ,दळवी मळा, शिंदे वाडी, नाट मळा या ठिकाणी  तहसीलदार यांचे आदेशान्वये कंटेन्टमेट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणचा परिसर संपूर्णपणे प्रतिबंधित करण्यात येत आहे.

तसेच जाधव मळा ढमढेरे वस्ती, मतकर वस्ती टी.बी सेंटर या ठिकाणी तहसीलदार याचे आदेशान्वये बफर झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी अत्यावश्यक सेवा (दवाखाने आणि मेडिकल) पूर्ण वेळ सुरु राहतील. मात्र इतर सर्व दुकाने  आठ दिवस  दि .८ एप्रिलच्या मध्य रात्रीपर्यंत बंद राहतील. वरील नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उलंघन केल्यास अतिशय कडक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी असा इशारा ग्रामपंचायतीने पत्रक काढुन दिला आहे .


"अरणगाव मध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे दिसत आहे.कोरोना अधिकृत संख्या कमी असली तरी संपर्कात आलेले लोक टेस्टिंग साठी पुढे येत नाहीत.आजारी असेल तर डॉक्टर कडे जातात औषधे घेतात आणि घरीच रहातात पण कोरोना टेस्टिंग करून घ्यायला पुढे कोणी येत नाहीत. " स्वाती मोहन गहिले ( सरपंच अरणगाव )
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post