नगर तालुक्यातील अकोळनेर येथे चार दिवस जनता कर्फ्यु

 अकोळनेर येथे चार दिवस जनता कर्फ्यु नगर  -दिवसो दिवस वाढत चालली कोरोना रूग्ण सख्या पाहता येथील ग्रामस्थांनी चार दिवस कडकडीत बंद पाळण्याचा  (जनता कर्फ )करण्याचा निर्णय घेतला आहे .अत्यावश्यक सेवा वगळता गाव उदया दि२६ पहाटे सहा ते दि२९ रात्री बारा वाजेपर्यत बंद राहणार आहे. दुसऱ्या लाटेत  बंद करणारे पहिले गाव आहे .

अकोळनेर ( ता. नगर ) येथील ग्रामस्थांनी आज बैठक झाली .कोरोना ची संख्या दिवसो दिवस वाढत चालली आहे . येथे आज पर्यत १४० नागरिकाना कोरोना ची लागण झाली .आठ लोकाना जीव गमवावा लागला आहे . सध्या बारा नागरिंकाना कोरोनाची लागण झाली आहे . खबरदारी म्हणून गाव स्वयंपुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यानी घेतला आहे . सकाळी सात ते नऊ वाजेपर्यत दुध डेअरी चालू राहिल . मेडिकल व दवाखाने फक्त चालू राहणार आहे . गावातील सर्व दुकाने बंद राहणार आहे . गावात कोरोना पासून सरंक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे . तरी गावकऱ्यानी सहकार्य करावे विनाकारण फिरू नये असे आवाहन सरपंच दादा कोळगे व उपसरपंच प्रतिक शेळके यांनी केले .


नगर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसो दिवस वाढत आहे . नागरिकानी काळजी घेण्याची गरज आहे विनाकारण फिरणे टाळावे . गावपातळीवर कोरोना बाबत निर्णय अकोळनेर येथील ग्रामस्थांनी गावच्या हितासाठी योग्य निर्णय घेतला आहे

ज्योती मांडगे आरोग्य अधिकारी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post