आचार्य आनंदऋषीजींचे विचार अत्यंत जीवनदायी : आ. संग्राम जगताप

 राष्ट्रीय संत आचार्य आनंदऋषीजी महाराजांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त आनंदधाम येथील समाधीचे दर्शन

आचार्य आनंदऋषीजींचे विचार अत्यंत जीवनदायी : आ. संग्राम जगतापनगर : राष्ट्रीय संत आचार्य 
आनंदऋषीजी महाराजांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहे. तसेच जैन समाजाचे श्रद्धास्थान आहे. संपूर्ण जगाला अहिंसा, प्रेम व शांतीचा संदेश देऊन धार्मिकतेचे महत्त्व पटवून दिले. आजच्या युवकांना त्यांच्या विचारांतून चांगली प्रेरणा घेऊन उत्तम पिढी निर्माण करण्याची संधी आहे. देशावर आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाचे संकट लवकरात लवकर दूर होऊन प्रत्येक नागरिकाचे आरोग्य निरोगी रहावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. आनंदऋषीजीचे विचार अत्यंत जीवनदायी आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रीय संत आचार्य 
आनंदऋषीजी महाराजांच्या २९ व्या पुण्यतिथी निमित्त आनंदधाम येथे जाऊन समाधीचे दर्शन घेताना आ. संग्राम जगताप. समवेत नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक विपूल शेटीया, माजी नगरसेवक संजय चोपडा, डॉ. विजय भंडारी, बाबुशेठ लोढा, मिलापचंद पटवा, शरद मेहेर, लकी खुबचंदानी, सुभाष पोखर्णा, अनिल दुग्गड, अभिजित खोसे, प्रशांत धाडगे, मळू गाडळकर आदी उपस्थित होते.

यावेळी आ. संग्राम जगताप यांनी महेंद्र
ऋषीजी  महाराज, आदर्शऋषीजी  महाराज, पदमऋषीजी  महाराज, कुंदनऋषीजी  महाराज आदींसह साधूसंतांची भेट घेऊन मार्गदर्शन व त्यांचे आशीर्वाद घेतले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post