राजेंद्र क्षीरसागर मसुरी येथे प्रशिक्षणासाठी जाणार, मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार 'यांच्या'कडे

 राजेंद्र क्षीरसागर मसुरी येथे प्रशिक्षणासाठी जाणार, मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार जगन्नाथ भोर यांच्याकडे
नगर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर हे १४ मे २०२१ पर्यंत मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण अकादमीत आय.ए.एस. पायाभूत प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२१ पासून भोर यांच्याकडे सदर कार्यभार सोपविण्यात येणार आहे. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post