'शून्य प्रोसेसिंग फी'वर मिळवा गृह आणि वाहन कर्ज

 गृहकर्ज व वाहनकर्जावरील प्रोसेसिंग फी माफीस मुदतवाढअहमदनगर : बँक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने आपल्या ग्राहकांना देण्यात येत असलेल्या कर्ज सुविधांमधील सवलत आणखी महिनाभर वाढविण्यात आली असून आता गृहकर्ज व वाहन कर्जावर लागणारी प्रोसेसिंग फी येत्या 31 मार्चपर्यंत घेण्यात येणार नसल्याचे बँकेचे अंचल व्यवस्थापक राजीव कदम यांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून गृह व वाहन कर्ज घेणार्‍यांसाठी प्रोसेसिंग फी माफ करण्यात आली आहे. याला आता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र बँकेतून गृह व वाहन कर्ज घेणे आता अधिक सोपे झाले असून, इच्छुकांनी या संधीचा लाभ लवकरात लवकर घ्यावा, असे आवाहन बँक व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post