ममता दीदींनी साडी नव्हे बरमुडा परिधान केला पाहिजे, भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली

 

ममता दीदींनी साडी नव्हे बरमुडा परिधान केला पाहिजे, भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरलीकोलकाता: पश्चिम बंगाल निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजपचे नेते दिलीप घोष यांची जीभ घसरली. ममता दीदींनी साडी नव्हे बरमुडा परिधान केला पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे टीएमसी कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

निवडणूक प्रचार करत असताना ममता बॅनर्जी यांच्या पायाला मार लागला होता. त्यामुळे त्यांनी काही दिवस व्हिलचेअरवरून प्रचार केला. त्यावर पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी आक्षेपहार्य विधान केलं. प्लास्टर कापलेलं आहे. क्रॅप बँडेज बांधलेलं आणि पाय वर करून सर्वांना दाखवत आहेत. साडी परिधान केलेली आहे. एका पाय उघडा आणि एक पाय झाकलेला आहे. अशा प्रकारची साडी नेसलेलं कधीच कुणाला पाहिलेलं नाही. पायच उघडे ठेवायचे असतील तर साडी तरी का नेसली? बरमुडा का नाही परिधान केला? असं धक्कादायक वक्तव्य दिलीप घोष यांनी केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post