गुड न्युज...शेतकऱ्यांना थकीत वीज बिलात 'इतके' टक्के सूट

 शेतकऱ्यांना थकीत वीज बिलात ३३ टक्के सूट मुंबई:  महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना थकीत वीज बिलात ३३ टक्के सूट देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज केली.

मागील काही दिवसांपासून थकीत वीज बिलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी व शेतकरी संघटनांनी राज्य सरकारला घेरलं होतं. शेतकऱ्यांनी वीज बिले भरण्यास नकार दिला होता. त्यानंतर कारवाई म्हणून कृषी पंपाची वीज तोडण्याची मोहीम महावितरणनं हाती घेतली होती. मागील आठवड्यातच वीज तोडण्यास स्थगिती देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती. आज थकीत वीज बिलात ३३ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, थकबाकीच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के अतिरिक्त माफी देण्यात येणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post