लग्न तसेच अन्य कार्यक्रमांना उपस्थित रहायचे‌ तर करोना चाचणी बंधनकारक

 लग्न तसेच अन्य कार्यक्रमांना उपस्थित रहायचे‌ तर करोना चाचणी बंधनकारकवर्धा-वर्धा जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता एखाद्या लग्नसोहळ्यात उपस्थित राहणाऱ्यांनाही कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलन, सामूहिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांना RTPCR चाचणी करावी लागणार आहे. कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांची RTPCR चाचणी झाली आहे की नाही याची खात्री झाल्यानंतरच कार्यक्रमास परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post