अर्बन बँकेतील २२ कोटींची कर्ज फसवणूक, आणखी दोघांना अटक

अर्बन बँकेतील २२ कोटींची कर्ज फसवणूक, आणखी दोघांना अटक



नगर : नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड करण्यात येथील शाखेतील २२ कोटींचा सादर फसवूणक प्रकरणी आणखी दोघांना गुन्ह्याची अटक करण्यात आली आहे. जयदीप  वानखेडे व आशुतोष लांडगे अशी  त्यांची नावे आहेत. 

पिंपरी चिंचवड स्थानिक गुन्हे  शाखेच्या पोलिसांनी दोघांनाही पुण्यातून सोमवारी दुपारनंतर अटक  केली. यापूर्वी याप्रकरणात नवनीत सुरपुरिया व यज्ञेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. त्या दोघांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत  (९मार्च) पोलिस कोठडी सुनावली.दरम्यान, सोमवारी याप्रकरणी वानखेडे व लांडगे यांना अटक करण्यात आली. बनावट मूल्यांकन सादर करून करण्यात आलेले या गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.वानखेडे यांना मंगळवारी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिस त्यांची कसून चौकशी करणार आहेत.कर्जप्रकरणात बनावट मुल्यांकन सादर करून चिंचवड शाखेची २२ कोटीची फसवणूक झाली होती. २६ मार्च २०१८ ते २५जानेवारी २०२१ दरम्यान, चिंचवड येथील बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला होता.




0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post