शिक्षक बँकेची २८ मार्चला सर्वसाधारण सभा

शिक्षक बँकेची २८ मार्चला सर्वसाधारण सभा - राजू राहणे 
अहमदनगर (प्रतिनिधी )राज्यातील पगारदार नोकरांच्या आर्थिक संस्थेमध्ये अग्रणी असणारी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सन 2019 20 ची वार्षिक सभा 28 मार्च रोजी ऑनलाइन संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन राजू राहणे व व्हाईस चेअरमन उषाताई बनकर साबळे यांनी दिली

कोरोनामुळे सहकार खात्याच्या निर्देशानुसार ही सभा ऑनलाइन झूम अॅप वर घेण्यात येणार आहे सालाबाद प्रमाणे अनेक महत्त्वाच्या विषयांना या सभेत मंजुरी देण्यात येणार आहे त्यामध्ये प्रमुख मुद्दा म्हणजे या वेळी बँकेच्या संचालक मंडळाने आपला स्टाफिंग पॅटर्न कमी करून व्यवस्थापन खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.कर्मचाऱ्यांची संख्या 30 ने कमी करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले .


 गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांपूर्वी सर्वांच्या सहकार्याने गुरुमाऊली मंडळ बँकेमध्ये सत्तेत आलं.सभासदांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवित वेळोवेळी सभासदांकडून प्राप्त झालेल्या सूचनांप्रमाणे विद्यमान संचालक मंडळाने कारभार केला.आम्ही सत्तेत आल्यापासून बँकेचा विकास आणि केलेली सभासदा भिमुख कामे यामुळे या वेळी सुद्धा गुरुमाऊली मंडळच सत्तेवर येईल असा ठाम विश्वासही राहणे व बनकर यांनी व्यक्त केला .

पाच वर्षांमध्ये बँकेच्या ठेवीत विक्रमी 535 कोटींची वाढ झाली. पाच वर्षांपूर्वी बँकेच्या ठेवी 582 कोटीच्या होत्या. त्या आज 1117 कोटींच्या आहेत .

पाच वर्षांमध्ये एकही दिवस कर्जवाटपात खंड पडलेला नाही अखंड व सुलभतेने कर्ज वाटप सुरू आहे.

कर्ज मर्यादेत विक्रमी 26 लाखाने वाढ.आज पस्तीस लाख रुपयापर्यंत कर्ज सभासदास दिले जाते .


 *कुटुंब आधार योजनेतून मयत सभासदाच्या वारसांना रुपये दहा लाखाची भरघोस मदत केली जाते* .

( एकूण 15 लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य मयत सभासदांच्या वारसांना केले जाते.)

 शैक्षणिक कर्ज योजना सुरु केली असून सभासदांच्या पाल्यांच्या उच्चशिक्षणासाठी रुपये 25 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जाते .

कन्यादान योजनेतून सभासदाच्या पहिल्या मुलीच्या लग्नासाठी 11 हजार रुपयाची मदत केली जाते .सभासदांच्या मागणी वरून आता सदर योजनेचे नाव शुभमंगल योजना असे करण्यात येत असून मुलींबरोबर मुलांच्या लग्नाला ही अकरा हजार रुपये दिले जातील.कर्ज घेण्यासाठी कोणत्याही संचालकाला फोन करण्याची गरज नाही. फोन करण्याची पद्धत बंद केली.सभासदांच्या मुला-मुलींना दिल्या जाणाऱ्या दोंदे पारितोषिक रकमेत दुपटीने वाढ.शिक्षक सभासदांसाठी माननीय कै.भा.दा.पाटील गुरुजी यांच्या नावाने पारितोषिक योजना सुरू केली.परागन्दा आणि आजारी व शैक्षणिक कारणाने रजेवरील सभासदांचे कर्ज हप्ते निधीतून भरण्याची तरतूद केली.जामीनदार चिंतामुक्त केले.कायम ठेवीवरील व्याजदर 4 टक्क्यांवरून 8.25 टक्के पर्यंत वाढविला.

कायम ठेवीचे व्याज 31 मार्चलाच खात्यावर जमा केले जाते .पाच वर्षापूर्वी  कर्जावरील व्याजाचा दर 11 टक्के होता. तो आता 9.50 टक्के आहे. पाच वर्षात सातत्याने कर्जावरील व्याजदर कमी केला.

वय वर्षे 51 पुढील सभासदांचे कर्जरोखे शाखेतच मंजूर करण्यास सुरुवात केली.RTGS/NEFT/CTS/ABB सुरू केली.मोबाईल ॲप सेवा सुरू.एटीएम सेवा सुरू केली त्याचा हजारो सभासद लाभ घेत आहेत.कर्मचाऱ्यांचा बोनस, मेहनताना, रजेचा पगार बंद केला.बँकेची स्वतःची वेबसाईट सुरू केली.www.shikshakbanknagar.com 

मासिक कायम ठेव 1900 रुपयांवरून 1000 रुपये केली.दरवर्षी वाढ करण्याची परंपरा खंडित करून कपात करण्याचा निर्णय घेतला.

स्टाफिंग पॅटर्न मध्ये ऐतिहासिक बदल करून कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून व्यवस्थापन खर्चात कपात. त्यामुळे कायम ठेवीला भरघोस व्याज दर देता आला.यावर्षी अवघ्या सव्वा टक्का फरकाने बँकेचा कारभार.बाहेरच्या ठेवीदारांपेक्षा बँकेच्या मालकांना त्यांच्या ठेवीचा पुरेपूर मोबदला. भ्रष्टाचाराचे सर्व मार्ग बंद केले . *कायम ठेव व मार्जिन ची पोटनियम दुरुस्ती* करण्यात येणार असून हे सर्व निर्णय हे गेल्या पाच वर्षांमध्ये घेण्यात आले असून या निर्णयांचा सभासदांना लाभ झाला आहे.सभासदांनी संचालक मंडळावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असे सांगून बँकेचे सर्व संचालक हे सभासदांच्या सेवेसाठी तत्पर असतात.गुरुमाऊली मंडळाचे राजकुमार साळवे व सर्व नेते कार्यकर्ते आणि बँकेचे कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने बँकेने या योजना राबविल्या असून बँकेचा सभासद चिंतामुक्त करण्याचे काम या संचालक मंडळाने केले आहे येणारी वार्षिक सभा यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन बँकेचे चेअरमन राजू राहणे, व्हाईस चेअरमन उषाताई बनकर, माजी चेअरमन संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप,शरद सुद्रिक, माजी व्हा चेअरमन विद्युल्लता आढाव,दिलीप औताडे, बाळासाहेब मुखेकर,अर्जुन शिरसाठ,सीमाताई निकम, नानासाहेब बडाख,ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण, गंगाराम गोडे, किसन खेमनर, बाबा खरात,अनिल भवार, राजु मुंगसे,अविनाश निंभोरे,मंजूताई नरवडे,संतोष अकोलकर, सुयोग पवार,.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post