३० वर्षीय युवकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या


३० वर्षीय युवकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्यानगर : पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील संदीप बाळासाहेब दरेकर (वय 30) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत संदीप यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही परंतु त्याची घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे. त्यांना दोन मुले, पत्नी व वृद्ध आई असा परीवार आहे.

याबाबत सुपा पोलिस स्टेशनला संतोष त्रिंबक दरेकर (रा. वाळवणे, ता.पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत संदीप बाळासाहेब दरेकर याने बुधवार दि.3 मार्च रोजी रात्री 10 ते गुरुवार दि. 4 मार्च सकाळी सातच्या दरम्यान घरातील छताच्या अँगलला नायलॉन दोरीच्या साह्याने गाळफास घेऊन आत्महत्या केली. ही गोष्ट शेजार्‍यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट तात्काळ सुपा पोलिस स्टेशनला कळवली. सुपा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोसे हे सहकार्‍यांसह ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्नालयात पाठवण्यात आला.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post