महसूलमंत्री थोरात यांच्या शासकीय निवासस्थानात नगर जिल्ह्यातील एकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

 महसूलमंत्री थोरात यांच्या शासकीय निवासस्थानात नगर जिल्ह्यातील एकाने केला आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलामुंबई: राज्याचे  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानात  विशेष कार्यकारी अधिकारी दालनात एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा एका व्यक्तीने प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे.

 ना.थोरात यांचा पेडर रोडवरील ‘रॉयल स्टोन’ हा आलिशान बंगला आहे. या बंगल्याच्या विशेष कार्यकरी अधिकारी दालनात  पांडुरंग वाघ या व्यक्तीने सदर प्रकार केला.या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी पांडुरंग वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पांडुरंग वाघ हे अहमदनगरच्या नेवासा येथील झापडी गावचे रहिवाशी आहेत. वाघ यांनी शासनाकडून 2018 मध्ये वाळू उत्खनन आणि वाहतूकीचा शासकीय परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी शासनाकडे 8 लाख 72 हजार भरले होते. माञ स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. यामुळे शासनाला भरलेले पैसे परत मिळावे यासाठी वाघ हे मुंबईत आले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post