राज्यात ॲक्टीव्ह रुग्णसंख्या पाऊण लाखांच्या पुढे...

 

राज्यात नवीन बाधितांच्या संख्येत किंचित घसरण



मुंबई: राज्यातील करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. मागील तीन दिवसातील दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्या वर आढळून आल्यानंतर, आज यामध्ये काहीशी घसरण झाल्याचे दिसून आले. शिवाय करोनातून बरे होणाऱ्यांची संख्येत देखील वाढ दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ३९७ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ५ हजार ७५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. याशिवाय राज्यात आज ३० रुग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ३० हजार ४५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९३.९४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.४१ टक्के आहे.  तसेच,  राज्यात आज रोजी एकूण ७७,६१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post