आमच्या पाठपुराव्यामुळेच बाजार समितीचे गेट खुले झाले, शिवसेना महाआघाडीचा दावा

 शिवसेना महाआघाडीच्या पाठपुराव्यामुळेच बाजार समितीचे गेट खुले

शिवसेनेचे बाजार समिती गेटवर आंदोलन अहमदनगर : कै. दादा पाटील कृषी उत्पन्न समितीचे गेट शिवसेनेच्याच पाठपुराव्यामुळे उघडण्यात आले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केले. गुरुवारी  दुपारी शिवसेना महाआघाडीच्या वतीने बाजार समिती गेटवर जाऊन महाआघाडीच्या पाठपुराव्यामुळे गेट उघडण्यात आला असा दावा यावेळी आघाडीच्या नेत्यानी केला. 

जि. प. सदस्य कार्ले म्हणाले, महिन्या दोन महिन्यापूर्वी हे गेट शिवसेनेनेच उघडले होते. परंतु आता काहीतरी कारण करून नाटक सुरु झालंय. नगर मधील दोन्ही खासदार खा. सुजय दादा विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे , जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यानी तिघांनीही वाहतूक नियंत्रण कमिटीमध्ये आवाज उठवून आम्ही केलेल्या मागणीला उत्तम प्रतिसाद दिला. याबाबत मार्केट कमिटीचे सचिव यांना दोन दिवसापूर्वी पत्र दिले होते. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे सरांनीही पत्र देऊन ताबडतोब गेट उघडण्यास सांगितले होते. आज हे गेट उघडण्यात आले. रस्त्यावरची ट्राफिक जाम होऊ नये यासाठी बॅरिकेट लावणे अपेक्षित होते. शिवसेनेच्या अखंड प्रयत्नामुळे बाजार समितीचे गेट खुले झाले आहे.

यावेळी नागसेवक योगीराज गाडे म्हणाले, अनेक वेळा शिवसेनेने गेट उघडण्या विषयी निवेदन दिले होते. गेट खुले व्हावे अशी स्व. अनिल भैया राठोड यांचीही इच्छा होती.  जानेवारी महिन्यातच तोंडी आदेश देण्यात आले होते. आदेश आल्यानंतर गेट उघडण्यास वीस दिवस का लागले? असा प्रश्न उपस्थित करून बाजार समितीला शेतकऱ्यांचे हित दिसत नाही, परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणार असल्याचे गाडे यांनी सांगितले.

तालुका प्रमुख राजेंद्र भगत यांनी शिवसेनेच्या मागणीला बाजार समितीने वारंवार हारताळ फासण्याचा प्रयत्न केला असून शिवसेना श्रेय घेत नाही तर शिवसेना समाजसेवा करत असल्याचे सूतोवाच केले. यावेळी 

जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले, माजी जिल्हा परीषद सदस्य बाळासाहेब हराळ , नगरसेवक योगीराज गाडे, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत , प्रकाश कुलट , जीवाजी लगड आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post