मोठी बातमी...रेखा जरे हत्याकांड खटल्यात ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

 रेखा जरे हत्याकांड खटल्यात ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीनगर:  यशस्विनी ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून खटल्यात  ख्यातनाम वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  यासंबंधीचा आदेश नुकताच महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केला आहे.

 रेखा जरे यांची जातेगाव घाट, (सुपा, ता. पारनेर, जि. अहमदननगर) येथे संगनमताने कट करून धारदार शस्त्राचा वार करून हत्या केली होती. यात तपासाअंती पत्रकार बाळ बोठे याचे नाव पुढे आले असून तो जवळपास तीन महिन्यांपासून फरार आहे. याप्रकरणी पोलिसांनी इतर आरोपीना जेरबंद करून भक्कम पुराव्याच्या आधारे सदर प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. तथापि, या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठे अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर खून खटल्यात यादव यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post