शेततळ्याजवळ अभ्यासाला गेलेली मुलगी बुडाली, तिला वाचवताना पित्याचाही मृत्यू

दुर्दैवी घटना... शेततळ्यात बुडुन बापलेकीचा मृत्यूअकोले : तालुक्यातील विरगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे.शेततळ्याच्या कडेला असणाऱ्या झाडाच्या सावलीला अभ्यास करण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना देखील मृत्युला सामोरे जावे लागले आहे.

ही घटना आज सोमवार दि. 29 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. यात आश्वीनी कृष्णांगर थोरात (वय 16) व कृष्णांगर जगन्नाथ थोरात (वय 45, दोघे रा. विरगाव, ता. अकोले, जि. अ.नगर) असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.

आश्विनी ही दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अभ्यास करण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. या दरम्यान तिचा शेततळ्याच्या कागदाहुन पाय घसरला आणि ती अगदी कोपऱ्यावरच घसरली.  तीने जोरजोराने आरडायला सुरूवात केली.आपल्या मुलीचा आवाज येत असल्याचे तिच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी हातातले काम टाकून थेट शेततळ्याकडे धाव घेतली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना देखील मृत्युला सामोरे जावे लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post