शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाचे बंडाचे निशाण, पंढरपूरमधून भरला उमेदवारी अर्ज

 शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शैला गोडसे यांचे बंडाचे निशाण, दाखल केली उमेदवारीपंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडाचे निशाण फडकावीत आज बैलगाडीतून वाजत गाजत येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शैला गोडसे हे गेल्या निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या मात्र गेल्यावेळीही त्यांना उमेदवारी नाकारल्याने यंदा त्यांनी बंडाचा झेंडा फडकावीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून वाड्यावस्त्यांपर्यंत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. जनतेसाठी वारंवार आंदोलने करणाऱ्या शैला गोडसे या महिला वर्गात विशेष लोकप्रिय असून जनतेच्या रेट्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून आपण काम करीत असून गेल्यावेळी उमेदवारी डावलल्यावरही आपण पक्षादेश मनाला होता. यंदा देखील शिवसेना पक्ष प्रमुख तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष या दोघांचीही भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जनता आणि कार्यकर्ते यांचा आग्रह असल्याने आपण अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post