सरकार मुलीच्या लग्नासाठी देणार ५१ हजारांचा शगुन

 पंजाब सरकार मुलीच्या लग्नासाठी देणार ५१ हजारांचा शगुन



चंदीगड: आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021च्या निमित्ताने पंजाब सरकारने मुलींसाठी मोठी घोषणा केलीय. पंजाब सरकार मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये शगुन देणार आहे. पंजाब राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, सरकारने शगुन योजनेंतर्गत दिलेली रक्कम 21,000 रुपयांवरून 51,000 रुपये करण्याचा प्रस्तावही ठेवला. या योजनेंतर्गत कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी शगुन दिले जाते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post