स्टेट बँकेकडून ठेवींवर अधिक व्याज देणारी आकर्षक योजना

 स्टेट बँकेकडून ठेवींवर अधिक व्याज देणारी आकर्षक योजनानवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजनेची मुदत  तिसऱ्यांदा वाढवली आहे. मे महिन्यात, बँकेने एसबीआय विकेअर ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजना जाहीर केली, जी सुरुवातीला सप्टेंबरपर्यंत होती. ही योजना डिसेंबरच्या अखेरीस पुन्हा वाढवण्यात आली, जी पुन्हा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली. आता ती तिसऱ्यांदा 30 जून 2021 करण्यात आली आहे.

60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.


– ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे.

– मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास अतिरिक्त व्याज मिळणार नाही.

– एसबीआय विकेअर ठेवीअंतर्गत नवीन एफडी खाते उघडणे किंवा जुन्या एफडी नूतनीकरण या दोन्ही बाबींवर जास्त व्याजाचा लाभ मिळू शकेल.

– एसबीआयची ही योजना आता 30 जून 2021 पर्यंत खुली आहे.

एसबीआय सर्वसामान्यांना 5 वर्षांच्या एफडीवर 5.4 टक्के व्याज देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष एफडी योजनेत निश्चित ठेव ठेवली असेल तर एफडीला लागू असणारा व्याज दर 6.20 टक्के असेल

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post