सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या तीन दिवसात महाराष्ट्रात 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी सचिनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
Post a Comment