'एसबीआय'ने ४४ कोटी युपीआय ग्राहकांना केलं सावध


'एसबीआय'ने ४४ कोटी युपीआय ग्राहकांना केलं सावध मुंबई : SBIने आपल्या ग्राहकांना फसवणूक टाळण्याबाबत अलर्ट जारी केला आहे. याबाबत बँकेने ट्विट करत सावधानीचा इशारा दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने UPI च्या जवळपास 44 कोटींहून अधिक ग्राहकांना फसवणूक होण्यापासून सावध केले आहे. UPI मार्फत खात्यातून पैसे डेबिट करण्याचा एसएमएस अलर्ट तुम्हाला मिळाला नाही तर सावध राहा, असेही बँकेने सांगितले. अनेक ठिकाणी फसवणुकीच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे SBI आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे, तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमची फसवणूक होईल.

SBI ने ट्विट करून आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्क केले आहे. जर यूपीआय (UPI) व्यवहार तुमच्याकडून झालेला नसेल आणि पैशांच्या डेबिटसाठी तुम्हाला एसएमएस मिळाला असेल तर प्रथम यूपीआय (UPI)सेवा बंद करा. यूपीआय सेवा बंद करण्यासंबंधी बँकेने माहिती दिली आहे. ऑनलाईन फसवणूक होण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे एसबीआय वेळोवेळी ग्राहकांना सतर्क करत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post