जय श्रीराम... मंदिरासाठी अवघ्या दीड महिन्यात जमले 'इतके' हजार कोटी

 राम मंदिरासाठी अडीच हजार कोटी निधी संकलननवी दिल्ली: अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून वर्गणी जमा केली जात होती. आतापर्यंत जमा झालेली वर्गणी ही तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्यावर गेली असल्याची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे. घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात येत असून यापूढे ऑनलाईन पद्धतीने वर्गणी गोळा केली जाईल असंही श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.


या काळात देशातील 40 हजार खेडी आणि शहरे तसेत 10 कोटी कुटुंबापर्यंत पोहचल्याचा दावा श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामध्ये 1.75 लाख टीम आणि नऊ लाख कार्यकर्त्यांचा सहभाग होता. वर्गणी गोळा करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी देशभरात 49 कंट्रोल रुम्स निर्माण करण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून देशभर समन्वय साधला गेला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post